भाडे करार संपला, बाडबिस्तरा गुंडाळा! भाडेकरूला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

भाडे करार संपला, बाडबिस्तरा गुंडाळा! भाडेकरूला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

भाडे कराराची मुदत संपूनही भाडय़ाच्या घरात तळ ठोकून राहिलेल्या भाडेकरूला उच्च न्यायालयाने झटका दिला. घर रिकामे करण्याच्या नोटिसीला स्थगिती देण्याची विनंती भाडेकरूने केली होती. मात्र न्यायालयाने ही विनंती अमान्य करीत याचिका फेटाळण्याचे संकेत देताच भाडेकरूने याचिका मागे घेतली. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे भाडेकरूंना भाडे करार संपताच भाडय़ाच्या घरातील बाडबिस्तरा गुंडाळावा लागणार आहे.

बोरिवली पश्चिमेकडील घर मालक दिलीप त्रिवेदी यांनी आपल्या भाडेकरूला घरभाडे नियंत्रण कायद्याच्या कलम 24 अंतर्गत घर रिकामे करण्यासाठी नोटीस बजावली. त्यानंतरही भाडेकरूने घराचा ताबा सोडला नाही. त्यामुळे त्रिवेदी यांनी कोकण विभागीय मंडळाकडे दावा दाखल केला. कोकण विभागीय मंडळाने भाडेकरूला घर रिकामे करून देण्याचे आदेश दिले. त्याविरोधात भाडेकरूने विभागीय आयुक्तांकडे अपील केले. ते अपील प्रलंबित असताना भाडेकरूने नोटिसीला स्थगिती देण्याची विनंती करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे सुनावणी झाली. भाडे करार संपल्यानंतर भाडेकरूला भाडय़ाच्या घरात राहण्याचा हक्क नाही, असा युक्तिवाद घर मालकातर्फे अॅड. यशोदीप देशमुख आणि अॅड. अमोल कांबळे यांनी केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने नोटिसीला स्थगिती देण्याची भाडेकरूची विनंती धुडकावली.

नेमके प्रकरण काय?

n 2016 मध्ये दिलीप त्रिवेदी यांनी आपला फ्लॅट दुष्यंत सोनी यांच्या कुटुंबीयांना भाडे कराराने दिला होता. सहा वर्षांनी सोनी यांनी 7 लाख 88 हजार रुपये थकीत भाडे धनादेशाद्वारे देऊन फ्लॅट 95 लाख रुपयांना विकत घेत असल्याची बनावट कागदपत्रे तयार केली.

n या प्रकरणी त्रिवेदी यांनी एफआयआर दाखल केला. त्याआधारे पोलिसांनी सोनी यांना अटक केली होती. नंतर त्रिवेदी यांनी सोनी यांना घर रिकामे करण्यासाठी नोटीस बजावली तसेच कोकण विभागीय मंडळाकडे दावा दाखल केला होता.

n कोकण विभागीय मंडळाने सोनी यांना घर रिकामे करून देण्याचे आदेश दिले. त्याविरोधात सोनी यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले. आयुक्तांकडे ते अपील प्रलंबित असतानाच सोनी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;