रमेश तेंडुलकर यांच्या स्मृतिदिनी विशेषांकाचे प्रकाशन
प्रसिद्ध कवी रमेश तेंडुलकर यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त 23 मे रोजी मराठी संशोधन पत्रिकेच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव येथे विशेषांकाचे प्रकाशन होईल.
रमेश तेंडुलकर 1979 ते 1989 या कालावधीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मराठी संशोधन मंडळाचे संचालक होते. मराठी संशोधन मंडळाला तसेच एपंदरीत मराठी साहित्याला रमेश तेंडुलकर यांनी मोठे योगदान दिले. यामुळे मराठी ग्रंथ ग्रंथसंग्रहालयाकडून रमेश तेंडुलकर यांच्या स्मरणार्थ मराठी संशोधन पत्रिका या नियतकालिकेचा रमेश तेंडुलकर विशेषांक प्रकाशित करण्यात येत आहे.
कार्यक्रमात डिंपल प्रकाशनातर्फे ‘रमेश तेंडुलकर यांच्या सहवासातील साहित्यिक’ या पुस्तकाची नवी आवृत्ती, तसेच नितीन तेंडुलकर यांच्या ‘उडता उडता’ आणि ‘अधिक उंच उडता उडता’ या दोन पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे. या कार्यक्रमाला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष शरद पवार तसेच सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. या वेळी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आणि मराठी संशोधन मंडळाचे माजी संचालक डॉ. प्रदीप कर्णिक यांची व्याख्यानेही होणार आहेत. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List