लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी अटक टाळली; गजानन कीर्तिकर स्पष्टच बोलले

लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी अटक टाळली; गजानन कीर्तिकर स्पष्टच बोलले

 

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या रवींद्र वायकर यांनी लोकसभेची उमेदवारी घेऊन अटक टाळली, असा दावा शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकर यांनी केला आहे.

ईडीची चौकशी सुरू झाल्यामुळे पक्ष बदलला, असं वायकर यांनी स्वतःच सांगितले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रकरणात मला ई-समरी द्या, मग मी उमेदवारी घेईन, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्यांची अटक टळली आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाची असलेली टांगती तलवार टळली, असे गजानन कीर्तिकर म्हणाले. शिंदे गटात वायकर हे महिना-दोन महिन्यांपूर्वीचे प्रॉडक्ट आहे. मला जमेल तेवढा प्रचार मी केला.  मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील लढत ही अटीतटीची होईल, असे चित्र असल्याचे कीर्तिकर म्हणाले.

ईडीबद्दल लोकांमध्ये संताप

ईडीबद्दल आता लोकांमध्ये संताप आहे. ईडीबद्दल लोकांमध्ये असलेली नाराजी भाजपच्या वरिष्ठांच्याही लक्षात आली असून पुढील काळात ते या कारवाया कमी करतील, असेही गजानन कीर्तिकर यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;