बीड, बारामतीत बोगस मतदान झाले! शरद पवार यांचा स्पष्ट आरोप

बीड, बारामतीत बोगस मतदान झाले! शरद पवार यांचा स्पष्ट आरोप

बीड, बारामती मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर बोगस मतदान झाले, असा स्पष्ट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. बीडमध्ये अनेक ठिकाणी मतदान पेंद्रे ताब्यात घेण्यात आली, बारामतीत एक बँक मतदानाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत उघडी होती. बोगस मतदान करणे, लोकांना मतदान न करू देणे, असे प्रकार घडल्याचेही पवार म्हणाले. पुण्यात देखील अशा घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.  दरम्यान, बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आज ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरूमला भेट दिली.

जे संघाचे तेच शिंदे, अजितदादांचे

भाजप आता सक्षम झाला असून आम्हाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नसल्याचे भाजपचेच राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा म्हणाले आहेत. ज्यांचा राजकीय विचारच संघाच्या मुशीतून येतो, त्या संघाबद्दल भाजपचे असे मत असेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबद्दलही त्यांचे मत फार वेगळे असेल असे वाटत नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला. शिंदे, अजितदादांची ज्या दिवशी गरज संपेल त्यादिवशी त्यांच्याबद्दलही असेच बोलले जाईल, असे पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;