तेंदूपत्ता घेऊन जाणाऱया 15 मजुरांवर काळाचा घाला; पिकअप ट्रक खड्डय़ात पडून अपघात

तेंदूपत्ता घेऊन जाणाऱया 15 मजुरांवर काळाचा घाला; पिकअप ट्रक खड्डय़ात पडून अपघात

तेंदूपत्ता गोळा करून पिकअप ट्रकमधून गावी परतणाऱया 15 मजुरांवर काळाने घातला. कावर्धा जिह्यात बहपनी गावाजवळ पिकअप ट्रक खड्डय़ात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. यात 14 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

पिकअप ट्रकमध्ये एकूण 25 मजूर होते. हा ट्रक 20 फूट खड्डय़ात पडला. या दुर्घटनेत 14 महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला, तर आठजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कावर्धाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी दिली. या घटनेनंतर छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी याप्रकरणी शोक व्यक्त केला. ही घटना वेदनादायी आहे, असे ते म्हणाले. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या सहवेदना आहेत. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;