मतदान केंद्रातील असुविधांमुळे कर्मचारी त्रस्त

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत झालेल्या मतदानासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कर्मचाऱयांसाठी अत्यंत अपुऱया सुविधा ठेवल्याचे आज स्पष्ट झाले. पिण्यासाठी पाणी नाही, पंखे नव्हते. वेळेवर जेवण-चहा मिळाला नाही अशा असंख्य तक्रारींचा पाढा मतदान केंद्रातील कर्मचाऱयांनी वाचून दाखवला.

मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर प्रचंड असुविधा असल्याचे दिसून आले. मतदान केंद्रांवरील कर्मचाऱयांकडून त्याबाबतच्या तक्रारी ऐकायला येत होत्या. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा देऊन काळजी घेण्याची सूचना निवडणूक आयोगाला दिली होती, पण तरीही पुरेशी काळजी न घेतल्याचे दिसून आले. अनेक मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे मतदान केंद्रांवर काम करणाऱया कर्मचाऱयांच्या घशाला कोरड पडली होती. अनेक मतदान केंद्रांवर पंख्यांची सुविधा नव्हती. त्यामुळे कर्मचाऱयांच्या अंगाची लाहीलाही झाली होती.

आपला दवाखानासुविधा नाही

मतदारांना आरोग्य सुविधा देण्यासाठी मतदान केंद्रांवर ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ची आरोग्य सुविधा पुरवण्याचे आश्वासन निवडणूक आयोगाने दिले होते. पण अनेक मतदारसंघांत ‘आपला दवाखाना’ ही सुविधा उपलब्ध नव्हती. धारावीतील रॉयल सिटी इंग्लिश हायस्कूलमध्ये उष्णतेच्या त्रासामुळे एका महिलेला चक्कर आली. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱयांची एकच धावपळ झाली.

चहाजेवण वेळेवर नाही

सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले, पण त्यानंतर दोन तासांपर्यंत चहा आला नाही. त्यामुळे कर्मचारी कंटाळले होते. काही मतदान केंद्रांवर चहा आला, पण तोही थंड झालेला होता. जेवणही वेळेवर पुरवले नाही अशी सार्वत्रिक तक्रार आहे. जेवणासाठी वाट बघावी लागली अशी कर्मचाऱयांची तक्रार आहे. मतदान पेंद्रांपासून लांब राहणाऱया अनेक कर्मचाऱयांनी मतदान केंद्रांवर रविवारी रात्रीपासूनच मुक्काम केला होता, पण पंख्यांची व स्वच्छतागृहांची चांगली व्यवस्था नसल्याची खासकरून महिला कर्मचाऱयांची तक्रार होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;