गैरसोयींमुळे मतदान केंद्रातच शिवसेनेच्या पोलिंग एजंटचा हार्ट अॅटॅकने मृत्यू

गैरसोयींमुळे मतदान केंद्रातच शिवसेनेच्या पोलिंग एजंटचा हार्ट अॅटॅकने मृत्यू

मतदान केंद्रांतील गैरसोयींनी लोकांचे जीवही घेतले. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात डिलाईल रोड येथील सखूबाई मोहिते मार्गावरील मतदान केंद्र क्रमांक 175 मध्ये शिवसेनेचे पोलिंग एजंट मनोहर नलगे यांचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला. मतदान केंद्रात मोकळी हवा नसल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते. मतदान संपल्यानंतर नलगे शौचालयात गेले आणि तिथेच कोसळले. शौचालयाचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढावे लागले. हार्ट अॅटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासणीनंतर समजले.

मनोहर नलगे हे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते होते. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या पोलिंग एजंटची भूमिका बजावली होती, पण आज ते निवडणूक आयोगाच्या गैरव्यवस्थेचे बळी ठरले, असे मत दक्षिण मुंबई मतदारसंघातील शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांनी व्यक्त केले.

यापूर्वी कोणत्याही निवडणुकीमध्ये इतकी गैरव्यवस्था नव्हती. आधीच मे महिना, त्यात मतदान केंद्रावर व्हेंटिलेशन नाही, पंखे नाहीत. अशा अवस्थेत घामाने चिंब होऊन नलगे सकाळपासून काम करत होते. त्यामुळेच अस्वस्थ होऊन त्यांना हार्ट अॅटॅक आला, असे सावंत म्हणाले. दक्षिण मुंबईत अनेक मतदान पेंद्रांची अशीच अवस्था होती. ओळखपत्रांमध्ये पुसपट काढून लोकांना माघारी पाठवले जात होते. लोक हैराण होऊन मतदानाला येऊ नयेत किंवा मतदान केंद्रावरून पळून जावेत म्हणून तर निवडणूक आयोगाने मतदारांना जाणीवपूर्वक असा त्रास दिला नाही ना, असा संशय येऊ लागलाय, असे अरविंद सावंत म्हणाले.

कंत्राटदारांना लाखो रुपये देऊनही दुरवस्था

मतदान केंद्रांना पडदे, खुर्च्या, पंखे व अन्य साहित्यासाठी पंत्राटदारांना लाखो रुपये देण्यात आले होते. त्या तुलनेत मतदान केंद्रांवर व्यवस्था केलीच नव्हती. नलगे हे निवडणूक आयोगाच्या अनास्थेचे बळी ठरले आहेत. त्याच मतदान केंद्रावर बाजूच्या बुकमध्ये एक निवडणूक कर्मचारीही भोवळ येऊन कोसळला. त्याला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार सुनील शिंदे यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;