पवईत ईव्हीएम मशीन दोन तास बंद; मतदारांचा प्रचंड संताप

पवईत ईव्हीएम मशीन दोन तास बंद; मतदारांचा प्रचंड संताप

पवईतील हिरानंदानी परिसरातील उच्चभ्रू वस्तीतील मतदान केंद्रात एक ईव्हीएम मशीन सकाळी साडेअकरा वाजता बंद झाल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. वेळ काढून आम्ही मतदानासाठी आलो. मात्र, इथे ईव्हीएम मशीन दोन तास बंद असूनही त्याची साधी दखल निवडणूक आयोगाने घेतली नाही, असा आरोप मतदारांनी केला. ईव्हीएम बंद असल्याचा फटका शिवसेना सचिव आदेश बांदेकर, त्यांचे पुटुंबीय तसेच दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह 100 जणांना बसला. दरम्यान, दोन तासांनंतर बंद असलेली मशीनच्या जागी दुसरी मशीन देऊन मतदान सुरू करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उन्हामुळे पंटाळल्याने काही जण मतदान न करताच घरी परतले.

हे भाजपचे कटकारस्थान!

ज्या ठिकाणी मतदार मोठय़ा संख्येने बाहेर पडले होते, अशा ठिकाणी मतदान धीम्या गतीने सुरू ठेवण्यासाठी जाणूनबुजून ईव्हीएम मशीन बंद ठेवण्यात आली. पवईत बंद पडलेल्या ईव्हीएममुळे मतदारांचा दोन तास खोळंबा झाला. मतदान कमी व्हावे, यासाठी हे भाजपचे कटकारस्थान असावे, असा आरोप शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी केला.

मिंध्यांच्या दिलीप लांडेंची मतदान केंद्रात लुडबुड

मिंधे गटातील चांदिवलीतील आमदार दिलीप लांडे यांनी पवईतील ईव्हीएम बंद पडलेल्या मतदान केंद्रात लुडबुड केली. ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी निवडणूक कर्मचाऱयांशिवाय कोणाला जाण्याची परवानगी नसताना दिलीप लांडे हे मतदान केंद्रात गेल्यामुळे या गोंधळात आणखी भर पडली. मतदारांनीही लांडे यांच्या घुसखोरीबद्दल संताप व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;