उत्तर मध्य मुंबईत सर्वसामान्यांच्या प्रतिसादानंतरही टक्का कमीच

उत्तर मध्य मुंबईत सर्वसामान्यांच्या प्रतिसादानंतरही टक्का कमीच

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात आज संध्याकाळी पाचपर्यंत झालेल्या मतदानाला सर्वसामान्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, सरासरी मतदान कमी झाले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 48.66 टक्के मतदान झाले तर एपूण मतदान 51.42 टक्के झाले. सांताक्रुझ, वांद्रे पूर्व या परिसरात मुस्लीम मतदार मोठय़ा संख्येने बाहेर पडले होते.

सकाळपासून संथ गतीने सुरू झालेल्या मतदानाला दुपारी 3 नंतर गती मिळाली. विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात 56.01 टक्के, चांदिवली विधानसभा क्षेत्रात 49.03, पुर्ला विधानसभा क्षेत्रात 50.02, कलिना विधानसभा क्षेत्रात 51.58, वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रात 51.85 तर वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात 51.53 टक्के असे एपूण 51.42 टक्के मतदान झाले.

विलेपार्लेत संथ मतदानामुळे गर्दी, मतदान न करताच मतदार परतले 

विलेपार्ले येथे संथ गतीने मतदान सुरू राहिल्यामुळे मोठी गर्दी झाली होती. त्याचा फटका मतदारांना बसला. शहाजीराजे हायस्पूलमधील मतदान केंद्रांवर हा प्रकार घडला. याबाबत मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नाराज झालेले काही मतदार मतदान न करताच पुन्हा घरी परतले. निवडणूक कर्मचाऱयांनी सहा वाजता गेट बंद करून रांगेत असलेल्या मतदारांचे मतदान घेण्यात आले. या केंद्रावर शेवटचे मतदान साडेसातला झाले.

शेवटी आजोबांनी मतदान केलेच!

उत्तर-मध्य मतदारसंघातील वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रातील नवजीवन विद्या मंदिर या मतदान केंद्रावर एक आजोबा आले खरे पण त्यांनी मतदान ओळखपत्र न आणल्यामुळे त्यांना परत जावे लागले. नाकात नळी, त्यांना बोलताही येत नव्हते. त्यामुळे ते केवळ खाणाखुणा करत होते. हे आजोबा पुन्हा येतील का, असे वाटत असताना पुन्हा काही वेळातच ओळखपत्र घेऊन ते पुन्हा मतदान केंद्रात आले. येताना त्यांना एका तरुणाने बाईकवरून मतदान केंद्रापर्यंत सोडले. त्यानंतर निवडणूक आयोगाने नेमलेल्या कर्मचाऱयाने व्हिलचेअरवरून त्यांना केंद्रापर्यंत नेले आणि शेवटी त्यांनी मतदान केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;