उत्तर पश्चिमची गाडी 53.67 टक्क्यांवर अडकली

उत्तर पश्चिमची गाडी 53.67 टक्क्यांवर अडकली

उन्हाचा तडाखा आणि त्यातच निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे धीम्या गतीने पुढे सरकणाऱया रांगा यामुळे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात मतदान केंद्राबाहेर मतदारांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभरात उत्तर पश्चिमची गाडी रखडत 53.67 टक्क्यांवर पोहोचली. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा या मतदारसंघात एक टक्क्यांनी मतदान कमी झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत येथे 54.37 टक्के मतदान झाले होते.

उत्तर पश्चिम मुंबईतील अंधेरी लोखंडवाला, वर्सोवा, गोरेगाव परिसरात अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रेटी वास्तव्यास आहेत. या सेलिब्रिटींनी कोणताही बडेजाव न करता सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर या सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.

ओशिवऱयात भाजपकडून मतदारांना भुलवण्याचे प्रयत्न

ओशिवरा येथील एका मतदान केंद्रावर भाजपच्या आमदार भारती लवेकर आणि भाजप नेत्या दिव्या ढोले जवळपास तासभर मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करत होत्या. यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी आक्षेप घेतला. त्यामुळे या मतदार केंद्रावर काही काळ गोंधळ निर्माण झाला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत भारती लवेकर, दिव्या ढोले यांना मतदान केंद्राबाहेर काढले.

जोगेश्वरीत तासभर ईव्हीएम बंद

जोगेश्वरी पश्चिम बेहराम बाग येथील एच के कॉलेज या मतदान केंद्रावर सकाळी तासभर ईव्हीएम मशीन बंद पडली होती. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. त्यानंतर संबंधित अधिकाऱयांकडून कार्यवाही करून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.

आयोगाच्या कारभारावर भाग्यश्री संतापली

‘मैने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्री हिने निवडणूक आयोगाच्या संथ कारभारावर नाराजी व्यक्त केली. मतदानासाठी तिला तब्बल दोन तास रांगेत उभे राहावे लागले. बिंबीसार नगर येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी दोन ते तीस तास लागत असल्यामुळे काहीजण मतदान न करताच घरी परतले. तर मतदार यादीत नाव सापडत नसल्यामुळे काही ठिकाणी मतदार आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;