‘नंबर वन’ची परंपरा राखली, पण उत्तर मुंबईचा टक्का घसरला

‘नंबर वन’ची परंपरा राखली, पण उत्तर मुंबईचा टक्का घसरला

उत्तर मुंबई मतदारसंघात सकाळपासून धीम्यागतीने सुरू असणाऱया मतदानाने सायंकाळी जोर पकडल्याने अखेर एपूण 55.21 टक्के मतदान झाले. दुपारी 1 वाजेपर्यंत या ठिकाणी केवळ 26.78 टक्केच मतदान झाले होते. या मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून सर्वाधिक म्हणजे 60.06 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे उत्तर मुंबई मतदार संघाने सर्वाधिक मतदानाची परंपरा राखली असली तरी मतदानात 5 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

मुंबईत सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असल्यामुळे सकाळी मतदान केंद्रांवर काहीशी गर्दी जाणवत होती. मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होते. मात्र पुन्हा 11 वाजल्यानंतर मतदान केंद्रांवरील गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसत हाते. 11 वाजेपर्यंत केवळ 14.71 टक्के मतदान झाले होते. मात्र दुपारी मतदानाचा वेग प्रचंड मंदावला. दुपारी 1 वाजेपर्यंत या ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीचा आकडा 26.78 टक्क्यांवर गेला. दुपारनंतर या ठिकाणी मतदानाचा आकडा काहीसा वाढून दुपारी 3 पर्यंत एपूण मतदानाची आकडेवारी 39.33 टक्क्यांवर गेली. यानंतर सायंकाळच्या सत्रात हा वेग काहीसा वाढत जाऊन सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा टक्का 46.91 टक्क्यांवर गेला. तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत अखेरचे सत्र संपल्यानंतर एपूण मतदानाचा आकडा 55.21 टक्क्यांवर गेला.

दहिसर पूर्व येथील 88 वर्षीय रहिवासी धन्वंतरी गोसर यांना आजारपणामुळे चालता येत नसताना व्हीलचेअरवरून येत मतदानाचा हक्क बजावला तर बोरिवली पश्चिम येथील सेंट फ्रान्सिस मतदान पेंद्रावर 88 वर्षीय बेनेजित्ता डिसोझा यांनी मतदानाचा हक्क बजावला.

 विभूती नारायण हायस्पूलमध्ये गैरसोय

दहिसर पूर्व अशोकवन येथील विभूती नारायण हायस्पूल येथे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मतदारांना तब्बल दोन ते अडीच तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागले. यामुळे लांबच लांब रांग निर्माण झाली होती. यातच प्रचंड ऊन आणि उकाडा असताना पाण्याचीदेखील सुविधा नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;