गुरुचरण सिंग घरी परतल्यानंतर निर्माते असित मोदी यांची पहिली प्रतिक्रिया

गुरुचरण सिंग घरी परतल्यानंतर निर्माते असित मोदी यांची पहिली प्रतिक्रिया

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत सर्वांना आपल्या विनोदबुद्धीने हसवणारा रोशन सिंग सोढी म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या 25 दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर अभिनेता 17 मे रोजी घरी परतला आहे. घरी परतल्यानंतर अभिनेत्याचा फोटो देखील समोर आला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गुरुचरण याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी देखील गुरुचरण याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

असित मोदी नुकताच झालेल्या मुलाखतीत म्हणाले, ‘मी खूप आनंदी आहे. कारण तो परत आला. मी त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. मी त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. तो नक्की कुठे गेला आहे… ही चिंता आम्हाला देखील सतावत होती. पण आता आला आहे, तर सर्वांनी मोकळा श्वास घेतला आहे.’

‘मला त्याच्याबद्दल अधिक काही माहिती नाही. पण आता गुरुचरण सिंगचं कुटुंबिय आनंदात आहे.’ असं देखील ‘तारक मेहका का उल्टा चष्मा’ मालिकेचे निर्माते अतिस मोदी म्हणाले आहेत. गुरुचरण याने 16 वर्ष मालिकेत काम केलं. पण गेल्या काही दिवसांपूर्वी मालिकेचा निरोप घेतला आहे.

 

रिपोर्ट्सनुसार, घर सोडण्यापूर्वी गुरुचरण सिंगची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. शिवाय अभिनेता डिप्रेशनमध्येही असल्याची माहिती समोर आली होती. आता अभिनेता घरी परतला आहे. घरी परतल्यानंतर लगेचच, दिल्ली पोलिसांनी अभिनेत्याची चौकशी केली आणि स्थानिक न्यायालयात अभिनेत्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

अभिनेता म्हणाला, दुनियादारी सोडून धार्मिक प्रवासासाठी गेलो होतो. कधी अमृतसर तर कधी लुधियानातील गुरुद्वारामध्ये राहत होतो. अखेर कळंल की आता घरी जायला हवं… म्हणून पुन्हा घरी आलोय… असं देखील अभिनेता चौकशीमध्ये म्हणाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;