देशभरात एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे मुसळधार पाऊस
देशात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय पक्षांची एकमेकांवर होणारी धूळफेक सुरू असतांना देशात नैसर्गिक परिस्थिती बदलली आहे. एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे मुसळधार पाऊस पहायला मिळत आहे. मध्य प्रदेशसह 9 राज्यांत उकाडा वाढला असून, केरळ, तामिळनाडूत पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मे महिन्यात देशात उष्णतेचा प्रभाव तीव्र झाला असून, जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सकाळी ११ वाजेनंतर रस्त्यांवर नागरिक दिसत त नाही. यादरम्यान हवामान खात्याने दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांत उष्णतेच्या लाट सांगितली आहे. या राज्यांमध्येही तापमानात सातत्याने वाढ होत असून, या राज्यांतील अनेक शहरांतील तापमान 43 ते 46 अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कमाल तापमान 46.9 अंशांवर पोहोचले. याशिवाय ओडिशा, झारखंड, गोवा, आसाम आणि त्रिपुरामध्ये आज उष्णतेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारपासून पाच दिवस तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस पडेल. त्याच वेळी, कर्नाटकात दोन दिवसांनी म्हणजे २१ मेपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत जोरदार पाऊस झाल्याने अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तामिळनाडूच्या एसडीआरएफच्या पथकाने पूरस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
थंड पेय व फळांची मागणी वाढली
देशात उष्णतेची लाट पसल्यामुळे नागरिकांकडून थंड पेय व फळांची मागणी वाढली आहे. शहरांसह ग्रामीण भागात टरबूज, खरबूज, अनानस, आंबे, चिकू आदी फळांची आवक वाढली आहे. शहरी भागात थंड पेय, रसवंती, बर्फाची पदार्थ, आइस्क्रिम आदी वस्तूंची विक्री वाढली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List