पैसे वाटपाच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे मौन

पैसे वाटपाच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे मौन

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अनेक ठिकाणी पैसेवाटपाचे व्हिडीओ व्हायरल झाले. काही उमेदवारांची नावे घेऊन त्यांना मतदान करा असे व्हिडीओ व्हायरल होत आहेत तरीही यंत्रणा गप्प आहेत, असा प्रश्न केला असता अशा प्रकरणांत कारवाई केली आहे. त्याबाबतची आकडेवारी जाहीर करू, पैसेवाटपावर कारवाई करू, असे मोघम उत्तर देत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी प्रश्नाला बगल दिली. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची आज मंत्रालयात पत्रकार परिषद झाली.

ते म्हणाले, ‘मतदान झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातात. त्यावेळी सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत ही स्ट्राँग रूम सील केली जाते. त्यानंतर त्यावर सह्या घेतल्या जातात. येथे उमेदवारांचे प्रतिनिधीही पहारा देऊ शकतात. तसे काही ठिकाणी आहेत. पुणे आणि बारामती येथे उमेदवारांचे प्रतिनिधी पहारा देत आहेत. स्ट्राँग रूमबाहेर पेंद्रीय सुरक्षा यंत्रणा, सीआरपीएफ आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांचा पहारा असतो. तीन टप्प्यांतील यंत्रणा भेदून आत जाणे पुणालाही शक्य नाही. बीडमधील मतदान पेंद्र ताब्यात घेण्याच्या प्रकाराबाबत आपल्याकडे तक्रार न आल्याचे चोक्कलिंगम म्हणाले. अशी तक्रार आल्यास कारवाई करू, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;