पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला

राज्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात उद्या, सोमवारी 13 मतदारसंघांत मतदान होत आहे. मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी संपली. मतदानाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंचवीस हजार पोलीस आणि पेंद्रीय सुरक्षा दलाच्या 36 अतिरिक्त तुकडय़ा तैनात केल्या आहेत.
राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपने मोठा धसका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्यावर उतरवण्याची वेळ भाजपवर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात तब्बल 25 सभा घेतल्या व त्यांना मुंबईत रोड शो करावा लागला. महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, नाना पटोले यांच्याबरोबरच अनेक पेंद्रीय नेते प्रचारात ताकदीने उतरले होते. राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रचारासाठी आले होते. ‘इंडिया’ आघाडीच्या शुक्रवारी बीकेसीवर झालेल्या अतिविराट सभेमुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;