सरकारी घर घेऊनही निकम यांनी हॉटेलची बिले उकळली! सचिन सावंत यांनी सादर केली बिले
राज्य सरकारने 2 टक्के स्वेच्छाधिकार कोटय़ातून अॅड. उज्ज्वल निकम यांना वर्सोवा भागात घर देऊनही त्यांनी 2011 ते 2014 या कालावधीत मुंबईत राहण्यासाठी हॉटेल बिलापोटी सुमारे 17 लाख रुपये उकळले, असा गौप्यस्पह्ट प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केला.
पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत यांनी उत्तर-मध्य मुंबईतील भाजपचे उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांच्यावर हा आरोप केला. सरकारी कोटय़ातून मंजूर झालेले घर, त्यांच्या फीबाबतचा शासननिर्णय, तसेच त्यांनी आकारलेली बिले यांचे पुरावे सचिन सावंत यांनी सादर केले. त्यामुळे नैतिकतेच्या पातळीवर उज्ज्वल निकम यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असे सावंत यांनी सुनावले.
मुंबईवरील ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्यातील खटल्यात ते सरकारी वकील होते. या हल्ल्याचा तपास, कसाबला झालेली फाशी हे सर्व काँग्रेसच्या काळात झाले. मात्र अॅड. निकम याचे श्रेय आता भाजपला देऊन यावर प्रचार करत असून हे दुर्दैवी आहे, अॅड. निकम यांना नीतिमत्ता नाही, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.
सरकारी वकील म्हणून कायदेशीर बाजू मांडताना त्यांनी राहण्यासाठी लाखो रुपयांची हॉटेल्सची देयके घेणे हे नैतिकतेच्या पातळीवर पुठे बसते?
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List