नड्डा म्हणतात, भाजपला संघाची गरज नाही!

नड्डा म्हणतात, भाजपला संघाची गरज नाही!

भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आमचा पक्ष सक्षम आहे. भाजप स्वतःचा कार्यभार स्वतः सांभाळतो, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एका मुलाखतीत नमूद करत भाजपला संघाची गरज नसल्याचे अधोरेखित केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे संबंध काय याबाबत अनेकदा चर्चा होत असते. संघ परिवारातील संघटनांची भाजपशी असणारी जवळीक अनेकदा दिसून आलेली आहे. असे असतानाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ऐन लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला संघाची गरज नसल्याचे भाष्य केले आहे. याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर ‘शिवाली हे खरंय’ अशी मिम्स आणि पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत.

वाजपेयींच्या काळातील आणि सध्याच्या भाजपमध्ये फरक काय, या प्रश्नाला उत्तर देताना नड्डा म्हणाले, सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू, थोडे कमी पडत असू तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज पडत होती. आज आम्ही मोठे झालो आहोत, सक्षम आहोत. त्यामुळे भाजपा स्वतःचा कार्यभार स्वतः सांभाळते. हा या दोन्ही कालखंडातला फरक आहे, असे त्यांनी सांगितले.

भाजपाला आता संघाच्या पाठिंब्याची गरज पडत नाही का? असं विचारलं असता नड्डा म्हणाले, पक्षाची आता वाढ झाली आहे. प्रत्येकाला ज्याची त्याची कर्तव्य आणि भूमिका आहेत. आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. आम्ही राजकीय संघटना आहोत. इथे गरजेचा प्रश्न नाही. आरएसएस ही एक वैचारिक शाखा आहे. ते वैचारिक दृष्टीने आपलं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं कामकाज पाहतो. हेच तर राजकीय पक्षांनी करायला हवं, असं नड्डा म्हणाले.

काशी, मथुरेत मंदिर बांधण्याची योजना नाही

काशी आणि मथुरेतील वादग्रस्त ठिकाणी मंदिर उभारण्याची कुठलीही योजना नाही, असे जे. पी. नड्डा यासंदर्भातील प्रश्नावर म्हणाले. ना अशी कुठली संकल्पना आहे, ना इच्छा आहे, ना नियोजन… पक्षाचा पह्कस हा महिला, दलित, गरीब आणि तरुणांचा विकास करण्यावर आहे, हे खुद्द मोदींनी ठरवले असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;