मतदानाचा पाचवा टप्प्याच्या तेरा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी पार पडत असून देशभरातील 49 मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या. या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, ठाणे, कल्याणसह तेरा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. या टप्प्यात राजाभाऊ वाजे, भारती कामडी, राजन विचारे, अरविंद सावंत, संजय दिना पाटील, अमोल कीर्तीकर, अनिल देसाई हे शिवसेनेचे शिलेदार निवडणुकीच्या आखाड्यात मशाल घेऊन उतरले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान घेण्यात येत आहे. आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीला उन्हाचा जबर चटका बसला. आता पाचव्या टप्प्यातही उष्णतेच्या लाटेचा जोर कायम आहे. देशभरातील 8 राज्यांमधील 49 मतदारसंघात पाचव्या टप्प्यात सोमवारी मतदान घेण्यात येणार आहे, आज या मतदारसंघातील प्रचार सायंकाळी पाच वाजता थांबला.
राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर -पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर -मध्य, मुंबई दक्षिण – मध्य आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघातील प्रचार थांबला असून येथे सोमवारी मतदान होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List