मुंबईकरांनो जबाबदारीने मतदान करा, उद्योगपती रतन टाटा यांचे आवाहन

मुंबईकरांनो जबाबदारीने मतदान करा, उद्योगपती रतन टाटा यांचे आवाहन

लोकसभा निवडणुकीत पाचव्या टप्पाचे मतदान 20 मे रोजी होणार आहे. दरम्यान, या आधीच्या टप्प्यात अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या पार्श्वभूमीवर टाटा सन्सचे अध्यक्ष एमेरिटस आणि उद्योगपती रतन टाटा यांनी नागरिकांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. रतन टाटा यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपला संदेश जारी केला. निवडणुकीत जबाबदारीने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले.

दरम्यान, बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खाननेही नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ‘सोमवारी मुंबईत मतदानाचा दिवस आहे. मी तमाम मुंबईकरांना आवाहन करतो की मतदानासाठी जा आणि जबाबदारीने मतदान करा’, असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

लोकसभा निवडणूक 2024-
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लोकसभेच्या एकूण 6 जागांवर आणि मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) 4 जागांवर सोमवारी मतदान होणार आहे. यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;