या हसऱ्या जोडप्याला कोणाची दृष्ट लागली! पत्नीच्या अपघाती निधनानंतर अभिनेत्यानेही संपवलं जीवन

या हसऱ्या जोडप्याला कोणाची दृष्ट लागली! पत्नीच्या अपघाती निधनानंतर अभिनेत्यानेही संपवलं जीवन

तेलुगू टेलिव्हिजन मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा काही दिवसांपूर्वी कार अपघातात मृत्यू झाला होता. मात्र पत्नीच्या अशा अपघाती निधनामुळे पतीने टोकाचे पाऊल उचलून आपलेही जीवन संपवले. पत्नीच्या निधनाच्या अवघ्या काही दिवसांमध्येच अभिनेत्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने मनोरंजनसृष्टी हादरली असून शोक व्यक्त केला जात आहे. तेलुगू इंडस्ट्रीत टीव्ही मालिकेतील अभिनेता चंद्रकांत यांनी जीवन संपवले आहे.

चंद्रकांत असे त्या अभिनेत्याचे नाव आहे. चंद्रकांतची पत्नी पवित्रा जयराम हिचे कार अपघातात निधन झाले होते. पत्नीच्य़ा जाण्याचे दुःख चंद्रकांतला सहन झाले नाही. तो पत्नी पवित्रा जयरामच्या निधनानंतर प्रचंड मानसिक तणावात होता. त्यामुळे अभिनेत्याने शुक्रवारी तेलंगणातील अलकापूर येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. इंडिस्ट्रीतील दोन कलाकारांच्या आकस्मित निधनामुळे तेलगू इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

चंद्रकांतने आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ‘तुझ्यासोबतचा शेवटचा फोटो (रडणारा इमोजी) मला एकटे सोडण्याचा विचार पचनी पडत नाही, माझी पावी (पवित्रा) आता नाही (रडत आणि प्रार्थना करणारा इमोजी) प्लीज, परत ये.’ चंद्रकांतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही, पापा (पवित्रा) परत ये ना…परत येत माझ्या डोळ्यातील अश्रू पुस… अशी भावनिक पोस्ट चंद्रकांतने केली.

तेलुगु आणि कन्नड अभिनेत्रीचे अपघाती निधन

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;