नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडे तीन कोटींचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडे तीन कोटींचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो झाला. या रोड शोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले होते. मोदींच्या रोड शोमुळे झालेले मुंबईकरांचे हाल कमी होते की काय आता त्या रोड शो चा खर्च देखील मुंबईकरांच्या खिशातून झाल्याची चर्चा आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या रो़ शो साठी तब्बल साडे तीन कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे म्हटले असून हा खर्च मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

देशात ‘चारशे पार’चा नारा दिला असला तरी याआधी दोन वेळा झालेल्या प्रचंड फसवणुकीमुळे जनतेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पायाखालची वाळू सरकलेल्या मोदींकडून महाराष्ट्र पिंजून काढला जात आहे. खुद्द नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात सुमारे 25 जाहीर सभा घेतल्या. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवार, 20 मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे मोदी यांचा घाटकोपर येथे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारासाठी रोड शो आयोजित केला होता. या रोड शोसाठी मुंबईतीलव अनेक रस्त्यांचे काम करण्यात आले होते, पोलिसांची अधिक कुमक बोलावण्यात आलेली, बॅऱिकेड्स लावण्यात आलेले.

”मुंबई महापालिकेने या रोड शोसाठी तीन कोटी 56 लाख रुपये खर्च केले आहेत. हा भाजपचा खासगी रोड शो होता तरी देखील करदात्यांच्या पैशातून याचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी निवडणूक आयोगाने कारवाई करत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संजय़ राऊत यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;