मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; नियोजन करुनच घराबाहेर पडा…
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पाहून आणि मेगाब्लॉकप्रमाणे नियोजन करूनच घराबाहेर पडल्यास त्रास होणार नाही. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असला तरी पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेवर रविवारी माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉकचा कालावधी असेल. ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द करण्यात आला आहे. तर काही फेऱ्या 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी या स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात आहे. अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. सकळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. या काळात सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.
मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत लोकल ट्रेन विलंबाने धावतील, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List