सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात, नवरा मुलगा आहे गडगंज श्रीमंत?

सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात, नवरा मुलगा आहे गडगंज श्रीमंत?

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी अनेक वर्ष जोडीदाराला डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची लेक सारा अली खान हिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अनेक सेलिब्रिटींना डेट केल्यानंतर सारा अली खान कोणासोबत लग्न करणार? असा प्रश्न चाहत्यांना देखील पडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. शिवाय अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल मोठी माहिती देखील समोर आली आहे. अशाच चाहते देखील अभिनेत्रीच्या लग्नासाठी उत्सुक आहेत.

रेडिटच्या एका पोस्टनुसार, सारा लवकरच लग्न करणार आहे. सारा एका श्रीमंत उद्योजकासोबत लग्न करणार असल्याचा दावा युजरने पोस्टमध्ये केला आहे. पोस्टनुसार, सारा आणि उद्योजकाच्या कुटुंबियांकडून दोघांच्या नात्याला होकार आहे. लग्नामुळे सारा प्रचंड आनंदी आहे… अशी देखील माहिती समोर येत आहे. उद्योजक देखील सारावर प्रचंड प्रेम करतो…

‘मेट्रो इन दिनो’ सिनेमानंतर सारा लग्न करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. सिनेमाची शुटिंग संपल्यानंतर सारा हिच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. पण यावर अद्याप सारा आणि तिच्या कुटुंबियांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण सर्वत्र सारा हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

सारा अली खान हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘केदारनाथ’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सारा हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सारा आजच्या घडीला बॉलिवूडच्या सर्वत प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. चाहत्यांमध्ये सारा हिच्या प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा तर रंगलेल्या असतात, पण खासगी आयुष्यामुळे देखील सारा कायम चर्चेत असते.

एवढंच नाही तर, सारा हिचं नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं, पण आपल्या मुलीने कोणाच्या प्रेमात पडू नये… असं अमृता सिंह हिला वाटतं. कारण अमृता हिने करियरच्या शिखरावर असताना सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलं आणि संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला.

सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;