तिसऱ्या लग्नानंतर चार महिन्यांनी सानिया मिर्झाचा एक्स पती हनिमूनवर, रोमांटिक होत शोएब मलिकने..

तिसऱ्या लग्नानंतर चार महिन्यांनी सानिया मिर्झाचा एक्स पती हनिमूनवर, रोमांटिक होत शोएब मलिकने..

पाकिस्तानी क्रिकेटर आणि सानिया मिर्झा हिचा एक्स पती शोएब मलिक हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शोएब मलिक आणि सानिया मिर्झाने काही वर्षे एकमेकांना डेट करून 2010 मध्ये हैद्राबादमध्ये लग्न केले. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांना एक मुलगा देखील आहे. शोएब मलिक याच्यासोबतच्या लग्नानंतर सानिया मिर्झा ही दुबईमध्ये शिफ्ट झाली. मात्र, अचानक शोएब मलिक याने आपल्या तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. यानंतर शोएब मलिक याच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली.

शोएब मलिक याने 20 जानेवारी 2024 रोजी पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले. या लग्नाचे काही फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोनंतर सानिया मिर्झा हिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. यानंतर हे स्पष्ट झाले की, शोएबने लग्न करण्याच्या काही महिने अगोदरच यांचा घटस्फोट झाला होता, शोएब मलिकवर सतत टीका केली जातंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik)

आता लग्न होऊन पाच महिने पूर्ण झाल्यानंतर पत्नीसोबत शोएब मलिक हा हनिमूनला गेलाय. आता यांच्या हनिमूनचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हनिमूनसाठी शोएब मलिक आणि सना जावेद हे न्यूयॉर्कला गेले आहेत. यावेळी रोमांटिक होत यांनी खास फोटो देखील काढले आहेत, जे व्हायरल होत आहेत.

या फोटोनंतर शोएब मलिक याच्यासोबतच लोक हे सना जावेद हिला देखील तूफान ट्रोल करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, दुसऱ्याचे घर तोडून ही किती दिवस आनंदी राहणार. दुसऱ्याने लिहिले की, बघा हिच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे, सानियाचे घर तोडून. तिसऱ्याने शोएब मलिक यालाच टार्गेट केल्याचे दिसत आहे.

तिसऱ्याने लिहिले की, एका आयुष्यात हा व्यक्ती अजून किती वेळा हनिमूनला जाणार आहे? सानिया मिर्झासोबत लग्न करण्याच्या अगोदरही शोएब मलिक याचे एक लग्न झाले होते. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट नेमक्या कोणत्या कारणाने झाला, हे अजूनही कळू शकले नाही. घटस्फोटानंतर काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना सानिया मिर्झा ही दिसली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;