महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत, 48 पैकी 46 जागा जिंकणार! मल्लिकार्जुन खरगे यांचा ठाम विश्वास

महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत, 48 पैकी 46 जागा जिंकणार! मल्लिकार्जुन खरगे यांचा ठाम विश्वास

महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद हॉटेल ग्रँड हयात, वाकोला येथे होत आहे. या पत्रकार परिषदेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आदी नेते उपस्थित आहेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

  • मोदी दरवेळी विरोधकांवर आरोप करत विरोधकांना देशद्रोही ठरवत स्वतः देशप्रेमी असल्याचे ढोंग करत आहेत, असा हल्लाबोलही खरगे यांनी केला.
  • मोदींनी दिलेले कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर जीएसटीसारखा जाचक कर बदलून ही प्रणाली सरळ आणि सुटसुटीत करण्यात येणार आहे.
  • आर्थिक राजधानी असलेल्या शहराकडेही मोदी यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या काळात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे.
  • काँग्रेसने जाहीरनाम्यात शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक आश्वासने दिली आहेत.
  • महाराष्ट्रातही महाविकास आघाडी मजबूत आहे. त्यामुळे राज्यात 48 पैकी 46 जागा महाविकास आघाडीला मिळतील.
  • मोदी सरकारने इतर राज्यातही फोडाफोडीचे राजकारण केले. त्याविरोधात इंडिया आघाडी लढत आहे.
  • मुंबईसह अनेक ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, हीच मोदी यांची लोकशाही आहे काय?
  • सर्व सरकारी यंत्रणा मोदींच्या इशाऱ्यावर चालतात. मात्र, आता निवडणुकीत तसेच होणार नाही. आता जनताच या लढ्यात उतरली आहे. त्यामुळे आता जनतेचा विजय होणार आहे.
  • भाजपने जनतेशी विश्वासघात केला आहे. धमकी, दबावतंत्र आणि प्रलोभने दाखवत इतर पक्ष फोडण्यात आले. तसेच मूळ पक्ष इतरांना देण्यात आला.
  • पंतप्रधान त्यांच्या भाषणात द्वेष पसरवत आहे. याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी अशा प्रकारची द्वेषपूर्ण वक्तव्ये केलेली नाही.
  • महाराष्ट्रात बेकायदा पद्धतीने महायुतीचे सरकार बनवण्यात आले. या असंवैधानिक सरकारला पंतप्रधान पाठिंबा देतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;