परिवर्तन होणार, इंडिया जिंकणार; बीकेसीत महाविकास आघाडीचे वादळ घोंघावले
डोक्यावर भगवी टोपी, गळय़ात भगवे उपरणे, छातीवर ठळकपणे लावलेले मशाल चिन्ह आणि आवेशात ‘आमची निशाणी मशाल’ अशा गर्जना करत मुंबईसह राज्यभरातील शिवसैनिकांचे वादळ बीकेसीत घोंघावले. या वादळाला काँग्रेस, राष्ट्रवादी, आप, समाजवादी पक्ष, शेकाप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे साथ दिली. ‘परिवर्तन होणार आणि इंडिया जिंकणार’ हा एकच ध्यास घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी बीकेसीतील मैदान दणाणून सोडले.

विरारचा छोटा मशालवीर
महाराष्ट्रातून गद्दारांना मुळासकट उखडून टाकणार आहोत, असा संदेश देण्यासाठी विरारचा अडीच वर्षांचा समर्थ आदावडे त्याचे वडील दिनेश आदावडे यांच्यासह बीकेसीतील परिवर्तन सभेत सहभागी झाला होता. छोटय़ा वीराची तेजस्वी मशाल बघणाऱयाला निष्ठsची आठवण करून देत होती.

टॅक्सीतून प्रचाराचा धडाका
शिवसेना शाखा क्रमांक 175 मधील शिवसैनिकांनी सकाळपासून शीव, चेंबूर, माटुंगा येथे टॅक्सीवर महाविकास आघाडीचे झेंडे लावून प्रचाराला सुरुवात केली. संध्याकाळी या टॅक्सीतून प्रचाराचा धडाका पूर्ण करत ते बीकेसीच्या सभेत पोहोचले. यावेळी मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या.

चिमुकल्याला घेऊन महिला सभेला
अंधेरी येथून जस्मिन सुलेमानी ही महिला आपल्या चार महिन्यांचा मुलगा आणि शेजाऱयांसह सभेला पोहोचली. चांगल्या भविष्यासाठी महाविकास आघाडी हा उत्तम पर्याय आहे, असे सुलेमानी म्हणाल्या.

मतदानासाठी जनजागृती
कोलकात्याला राहणारे नरेशकुमार गुप्ता (61) हे दिल्लीवरून खास बीकेसीतील सभेसाठी आले. लोकांमध्ये मतदानाचा उत्साह वाढवण्यासाठी आणि महाविकास आघाडीला मतदान करा, आपले मत खूप किमती आहे ते फुकट वाया घालवू नका, तुमच्या एका मतानेच परिवर्तन होणार आहे.
शिवसेनेची पेटली मशाल…
शंखनाद होऊ दे,
रणदुदुंभी वाजू दे,
नादघोष गर्जू दे विशाल…
दुष्टशक्ती जाळण्या,
मार्ग स्पष्ट दावण्या
पेटू दे शिवसेनेची मशाल…
हिंदू हा तुझा धर्म,
जाणून घे हेच मर्म
जीवन कर त्यास तू बहाल…
दुष्टशक्ती जाळण्या,
मार्ग स्पष्ट दावण्या
शिवसेनेची पेटली मशाल…
एक स्वप्न, एक चिन्ह
शिवसेनेची मशाल!
जय भवानी…
निष्ठा उत्तुंग भगव्याशी
इंडिया–महाविकास आघाडीच्या बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानावर विराट परिवर्तन सभेत अलोट उत्साह पाहायला मिळाला. माहीम शाखेतील दिलीप दवणे या शिवसैनिकाने भगवा झेंडा उंचावत आम्ही मशाल आणि भगव्याशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत
बीकेसीतील सभेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ‘आप’चे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाजपने खोटय़ा आरोपाखाली तुरुंगात पाठवले, मात्र केजरीवाल यांच्या कार्यकर्त्यांचे त्यांच्यावरील प्रेम जराही कमी झालेले नाही. जामिनावर बाहेर असलेल्या केजरीवाल यांचे कार्यकर्त्यांनी सभेत जोरदार स्वागत केले.

महाराष्ट्र हरला नाही, हरणार नाही
शिवसैनिकांचे जथेच्या जथे बीकेसीत येत होते. यावेळी जोगेश्वरी येथून आलेल्या युवा शिवसैनिकाच्या हातातील फलक भाजपचे पितळ उघडे पाडणारे होते, जुमलेबाजीला चपराक देणारे होते. ‘महाराष्ट्र हरला नाही, हरणार नाही. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला नाही, कधी झुकणार नाही’ अशा संदेशाखाली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नमन करणारे नरेंद्र मोदी दिसत आहेत, तर दुसऱया फलकात ‘अब की, बार भाजप तडीपार’ अशा फलकात डोक्याला हात लावलेले मोदी आणि अमित शहा दिसत होते. हे दोन्ही फलक सगळय़ांचे लक्ष वेधून घेत होते.

तरुणांच्या भविष्यासाठी महाविकास आघाडीला साथ
जुहूच्या नेहरूनगरमध्ये राहणाऱया मुत्तू कुमार यांनी त्यांच्या युवा मित्रांसह सभेला हजेरी लावली. ते कार्यरत असलेल्या ‘वे ऑफ होप’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीपासून दूर करत मुले, महिला आणि दिव्यागांच्या हक्कांसाठी लढणाऱया संस्थेलाही आता परिवर्तन हवे आहे.

महाविकास आघाडीचे एकीचे बळ
अंधेरीतील डी.एन. नगर शाखा 67 च्या वतीने सभेत सहभागी झालेल्या शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकीचे बळ दाखवत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि इंडियातील नेत्या सोनिया गांधी, शरद पवार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल यांचे पह्टो असलेले फलक उंचावून महाविकास आघाडीच्या विजयाची घोषणा केली.
जिद्दीला सलाम
वांद्रे येथील एम. ए. पटेल या 92 वर्षांच्या आजोबांनी सभेला हजेरी लावली. हातात काठी घेत कोणाच्याही मदतीशिवाय रिक्षातून सभास्थानी पोहोचले. मी आतापर्यंत पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्राr, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाहीर सभेतील भाषणे ऐकली आहेत. ते माझ्या आयुष्यातील खास क्षण होते. ही सभाही माझ्या आयुष्यातील खास सभा आहे. महाविकास आघाडी ही सर्वसमावेशक असून सर्वसामान्य माणसाला पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलो आहे, असे पटेल यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List