गुरुचरण सिंग 25 दिवसांनंतर परतला घरी; म्हणाला, ‘दुनियादारी सोडून मी…’, मोठी माहिती समोर

गुरुचरण सिंग 25 दिवसांनंतर परतला घरी; म्हणाला, ‘दुनियादारी सोडून मी…’, मोठी माहिती समोर

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत सर्वांना आपल्या विनोदबुद्धीने हसवणारा रोशन सिंग सोढी म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या 25 दिवसांपासून बेपत्ता होता. अभिनेत्याला शोधण्यासाठी मुंबई, दिल्ली, पोलीस कसून चौकशी करत होते. पण पोलिसांच्या हाती अभिनेता लागला नाही. 25 दिवसांनंतर अभिनेता स्वतःहून घरी परतल्याची माहिती मिळत आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्याची कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे गुरुचरण याच्या वडिलांना तक्रार दाखल केली होती. घरी परतल्यानंतर अभिनेत्याने स्वतःबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेता 25 दिवस कुठे आणि काय करत होता… याची माहिती गुरचरण यांनी पोलिसांच्या चौकशीत दिली आहे.

रिपोर्टनुसार, गुरुचरण सिंग स्वतःहून घरी परतला आहे. घरी परतल्यानंतर अभिनेत्याची पोलिसांनी चौकशी केली. चौकशी दरम्यान अभिनेत्याने मोठा खुलासा केला. अभिनेता गेल्या 25 दिवसांपासून वेगवेगळ्या गुरुद्वारामध्ये राहत होता. दुनियादारी सोडून धार्मिक प्रवासासाठी गेलो होतो. कधी अमृतसर तर कधी लुधियानातील गुरुद्वारामध्ये राहत होतो. अखेर कळंल की आता घरी जायला हवं… म्हणून पुन्हा घरी आलोय… असं देखील अभिनेता चौकशीमध्ये म्हणाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.

गुरूचरण सिंग वडिलांचा वाढदिवस सारजा केल्यानंतर 22 एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईकडे येण्यासाठी निघाला होता. पण 26 तारखेपर्यंत अभिनेता मुंबईत पोहोचलाच नाही. अभिनेत्याचा मोबाईल देखील बंद होता. अशात गुरुचरण याच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. अखेर अभिनेत्याच्या वडिलांनी पालम पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले. अभिनेत्याबद्दल रोज नवी अपडेट मिळत होती. पण गुरुचरण कुठे आणि काय करत आहे? कोणालाही माहिती नव्हतं…

दरम्यान, अभिनेता लग्न करणार असल्याचीही चर्चा देखील तुफान रंगली होती. शिवाय अभिनेता आर्थिक संकटाशीही झुंजत होता… अशी माहिती देखील समोर आहे. पण बेपत्ता झाल्याच्या काळात अभिनेत्याने अनेकदा व्यवहार केले.अभिनेत्याचे एटीएममधून पैसे काढतानाचे फुटेज समोर आले. गुरुचरण याने 14 हजार रुपये काढल्याचे सांगण्यात आले. तर गुरुचरण याचे 10 हून अधिक बँक अकाउंट असल्याची माहिती देखील पोलीस तपासात समोर आली.

गुरुचरण याने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत रोशन सिंग सोढी भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण काही महिन्यांपूर्वी अभिनेत्या मालिकेचा निरोप घेतला होता. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरुचरण कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करायचा. आता अभिनेता पुन्हा घरी परतल्यामुळे कुटुंबिय आणि चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;