श्री सदस्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांना मतदान का करायचे? आम आदमी पार्टीचा सवाल
श्री सदस्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांना मतदान का करायचे, असा सवाल आम आदमी पार्टीने केला आहे. खारघरमधील श्री सदस्यांच्या कार्यक्रमाच्या आयोजनात महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांचादेखील हात असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले असताना लोकसभेवर अशा उमेदवाराला का निवडून पाठवायचे असादेखील प्रश्न आपने उपस्थित केला. आपच्या वतीने ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सवाल केला.
मिंधे सरकारने गेल्या वर्षी 16 एप्रिल रोजी खारघर येथे महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात 14 श्री सदस्यांचा निष्पाप बळी गेल्यानंतरही अद्याप कोणावर कारवाई करण्यात आली नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः जबाबदारी स्वीकारायला हवी होती. मात्र असे न करता खारघर येथील कार्यक्रमाची जबाबदारी ज्यांना देण्यात आली होती अशा म्हस्के यांना थेट निवडणूक लढवण्यास उतरवून कोणता संदेश द्यायचा आहे असा सवाल आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी केला आहे. मृत्युमुखी पडलेले श्री सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांबद्दल शिंदे सरकार अजिबात गंभीर नसून फक्त वेळकाढू धोरण अवलंबिले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
तेव्हाच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल!
खारघर पोलिसाकडून पुढे काहीच कारवाई न झाल्याने नाइलाजास्तव पनवेल कोर्टात धाव घेत न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायाधीश सुशीला पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी चालू असून पुढील महिन्यात 26 जून रोजी या प्रकरणाचा अपेक्षित निकाल आल्यानंतर श्री सदस्यांच्या आत्म्याला शांती मिळेल असे धनंजय शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला अजिबात मत देऊ नका असे आवाहन यावेळी करण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List