पनवेलमधील मराठी मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याची चौकशी करा! शिवसेनेची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

पनवेलमधील मराठी मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याची चौकशी करा! शिवसेनेची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

पनवेल शहरातील शेकडो मराठी मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याने मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेकांना मतदान करता आले नाही. ही नावे गायब होण्यास कोण जबाबदार आहे याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. महापालिका तसेच विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी चुका दुरुस्त करून यादी अपडेट करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेलचा भाग येत असून 13 मे रोजी झालेल्या मतदानाच्या वेळेस अनेक मराठी व अन्य मतदारांची नावे गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. मतदारांनी पक्षाकडे यादी व निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील यादीमध्येही नावे शोधण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरही जाऊन चौकशी केली, पण कोणताच ठावठिकाणा लागला नाही. या घटनेची शिवसेनेच्या नवीन पनवेल शहर महिला संघटक अपूर्वा प्रभू यांनी दखल घेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

महापालिका, विधानसभेला फटका बसण्याची भीती अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नवीन पनवेलमधील अनेक मराठी मतदारांकडे ओळखपत्रे आहेत, पण यादीत नाव नाही. विशेषतः ‘एमटी’ या मालिकेतील अनेक मतदारांची नावे नसल्याचे आढळून आले. 2014 मध्ये ज्यांनी नोंदणी केली होती त्यांच्या ओळखपत्रांचे क्रमांक आहेत, पण नाव नाही. मतदार जिथे राहतात त्या शहराऐवजी दुसऱ्याच शहराचे नाव यादीत नमूद केले आहे. या भोंगळ कारभाराचा फटका भविष्यात होणाऱ्या महानगरपालिका व विधानसभेच्या निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यातील चुका दुरुस्त कराव्यात अशी मागणी अपूर्वा प्रभू यांनी केली आहे. निवेदनासोबत त्यांनी बुथ क्रमांक 346 व 339 यादीतील गहाळ झालेल्या मतदारांच्या नावांची यादीही जोडली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;