शिवतीर्थावर महायुतीचा फ्लॉप शो; मोदींचे भाषण सुरू असताना लोक निघाले

शिवतीर्थावर महायुतीचा फ्लॉप शो; मोदींचे भाषण सुरू असताना लोक निघाले

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवाजी पार्कवर आयोजित महायुतीच्या सभेचा आज फ्लॉप शो पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण पूर्ण होण्याच्या आधीच लोकांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली. शिवाजी पार्क मैदानातील शेवटच्या भागातील अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. मोदींच्या सभेला मुंबईकरांचा कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आज दिसून आले.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महायुतीचे उमेदवार व नेते उपस्थित होते. पण सभेला मुंबईकरांचा प्रतिसाद कमी मिळाला, कारण सभेतील मागील खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या.

विकासाऐवजी मोदींवर स्तुतिसुमने

महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारात विकासाच्या मुद्यावर भाषण करण्याऐवजी मोदींवर स्तुतिसुमने उधळली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करताना भाजप कार्यकर्त्याच्या भूमिकेत शिरले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही त्यांच्या भाषणात मोदींवर स्तुतिसुमने उधळली.

मोदींची फेकूगिरी

या सभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासनांची खैरात केली. देशातील 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावरील खर्च मोदी सरकार करील. देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबईला मिळणार असा दावा केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

विकसित भारत झाल्यावर जाणार

मी परत येईन तेव्हा देश जगातील तिसरी आर्थिक महासत्ता झालेली दिसेल. मी विकसित भारत देऊन जाईन अशी घोषणा त्यांनी केली.

सभेला मनसेच्या पाठिंब्याचा टेकू

मोदींच्या सभेच्या  गर्दीला मनसेच्या पाठिंब्याचा टेकू मिळाला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांची संख्याच अधिक होती. यावेळी राज ठाकरे यांनी मोदींकडे पाच-सहा मागण्या मांडल्या त्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी, मुंबई-गोवा महामार्ग, शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याबरोबरच मुंबईतील लोकल सेवा सुधारण्याची मागणी केली.

मशालीसमोर मोदी नतमस्तक

या सभेनंतर नरेंद्र मोदी यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांनी अभिवादन केले. स्मृतिस्थळावरील धगधगत्या मशालीसमोर मोदी नतमस्तक झाले.

शिंदेंनी भाषणाचे मुद्दे हातावर लिहिले

या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कागदावर लिहून आणलेले भाषण वाचून दाखवले. एवढेच नव्हे तर, डाव्या तळहातावरही भाषणाचे मुद्दे लिहिले होते. भाषण करताना तळहात पाहून मुद्दे मांडताना दिसत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;