मी माझं लेकरू तुम्हाला सोपवतेय! रायबरेलीत सोनिया गांधी भावुक

मी माझं लेकरू तुम्हाला सोपवतेय! रायबरेलीत सोनिया गांधी भावुक

मी माझं लेकरू तुमच्याकडे सोपवते आहे. ज्याप्रमाणे तुम्ही मला आपलं मानलं, त्याप्रमाणे त्यालाही आपलं समजून सांभाळून घ्या. राहुल तुम्हाला कधीही निराश करणार नाही, असे आवाहन आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी भावुक होत रायबरेलीच्या जनतेला केले.

मी आज जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे. तुम्ही मला आपले मानलेत, असे म्हणत त्यांनी 20 वर्षे खासदार म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल येथील जनतेचे आभार मानले. जसे मला आपले मानलेत तसेच राहुल यांनाही तुमचेच समजा. तो खचितच तुमची निराशा करणार नाही, असे त्या म्हणाल्या. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघेही या वेळी त्यांच्यासमवेत स्टेजवर उपस्थित होते.

राहुल गांधी यांचा दावा

देशभरातील तरुणांनी आता आपले ठाम मत बनवले आहे की, त्यांना नरेंद्र मोदी नको आहेत. आणि 4 जूननंतर, ज्या दिवशी निकाल जाहीर केला जाईल तेव्हा मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत आणि इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल. ते सरकार जनतेचे असेल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. रायबरेलीतून देशाला संदेश पाठवा की, तुम्हाला स्वच्छ राजकारण हवे आहे आणि नरेंद्र मोदींचे सरकार फेकून द्या, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी सभेत केले.

इंदिराजी आणि तुम्ही दिलेली शिकवणच मुलांना दिली आहे

इंदिरा गांधी आणि रायबरेलीच्या लोकांनी मला जी शिकवण दिली तीच मी मुलांकडे सोपवली आहे. सर्वांचा आदर करा, दुर्बलांचे रक्षण करा, लोकांच्या हक्कांसाठी अन्यायाविरुद्ध लढा. घाबरू नका, कारण, संघर्ष आणि परंपरेशी तुमची नाळ खूप खोलवर जोडली गेली आहे हे मी राहुल आणि प्रियंका यांना शिकवले आहे, असे सोनिया या वेळी म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;