शिरूरमधील स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही बंद; राष्ट्रवादीची चौकशीची मागणी
बारामतीनंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदानानंतर ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या रांजणगाव एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामातील या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही 24 तास बंद ठेवल्याचे ट्विट करून करून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आपल्याला एकही जागा जिंकता येणार नाही हे लक्षात आल्यानेच एका गटाकडून तर हे केले जात नाही ना? असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी अजित पवार गटाकडे इशारा केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List