मुंबईत आज शिवसेनेच्या प्रचाराचा झंझावात; उद्धव ठाकरे यांचा रोड शो आणि जाहीर सभा

मुंबईत आज शिवसेनेच्या प्रचाराचा झंझावात; उद्धव ठाकरे यांचा रोड शो आणि जाहीर सभा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने मुंबईसह राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईतून लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या शनिवार, 18 मे रोजी मुंबईत झंझावाती प्रचार दौरा होणार आहे. या दौऱयात भांडुपविक्रोळी आणि अंधेरीजोगेश्वरी  परिसरात भव्य रोड शो. तर दादर खांडके बिल्डिंग आणि अभ्युदयनगर काळाचौकी येथे जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद

महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद 18 मे रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल ग्रँड हयात, वाकोला येथे होणार आहे. या पत्रकार परिषदेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी का@ँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, का@ँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, का@ँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 11.00 वा – मुंबई उत्तरपूर्व लोकसभा रोड शो

मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी भांडुप-विक्रोळी परिसरात उद्धव ठाकरे यांचा रोड शो होणार आहे. या रोड शोची सुरुवात भांडुपगाव शिवाई विद्या मंदिर कांजुरमार्ग टी जंक्शन येथून होईल. कन्नमवार नगर पोलीस चौकी जनता मार्पेट, टागोर नगर रोड, गांधी नगर, सूर्यानगर राज लॅगसी सोसायटी, पवई परिसर, एल.बी.एस. मंगतराम पेट्रोल पंप गाढवनाका, शिवाजी तलाव,  सुभाष नगर, देशमुख गार्डन पॅम्पस हॉटेल येथे या रोड शोची सांगता होईल.

दुपारी 0200 वा –  मुंबई उत्तरपश्चिम येथे लोकसभा रोड शो

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी अंधेरी-जोगेश्वरी परिसरात उद्धव ठाकरे यांचा रोड शो होणार आहे. या रोड शोची सुरुवात अंधेरी-पुर्ला रोड सागबाग येथून होईल. सागबाग साई मंदिर वसंत ओअॅसीस, तन्वी सुपर मार्पेट चौक, मिलिटरी रोड जंक्शन, सेव्हन हिल्स हॉस्पिटल, विजय नगर, एमआयडीसी पोलिस ठाणे, कनोसा सर्पल ते होली स्पिरीट हॉस्पिटल, तक्षीला-पूनम नगर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड ते गणपती मंदिर श्याम नगर तलाव, रामवाडी, प्रताप नगर पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे रोड शोची सांगता होईल.

दादर आणि अभ्युदय नगरमध्ये जाहीर सभा

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची दुपारी 3ः45वाजता खांडके बिल्डिंग दादर येथे जाहीर सभा होणार आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची दुपारी
4 वाजता अभ्युदय नगर काळाचौकी येथे जाहीर सभा होणार आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सायंकाळी 5 वाजता मुंबादेवी मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर या प्रचार दौऱयाची सांगता होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;