पाकिस्तानचा संघ जाहीर, पण आयसीसीकडे

पाकिस्तानचा संघ जाहीर, पण आयसीसीकडे

 

आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानवगळता 19 संघांनी आपापले 15 सदस्यीय संघ जाहीर केले आहेत. पाकिस्तानच्या संघाने आपला संघ जाहीर केला नसला तरी त्यांनी आपल्या 15 खेळाडूंची यादी आयसीसीकडे सोपवल्याची माहिती आधीच बाहेर आली होती आणि आता तो संघही बाहेर आला आहे. बाबर आझमकडेच पाकिस्तानचे नेतृत्व असून दुखापतीमुळे बाहेर असलेला हारिस रऊफ तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या मोहम्मद आमीर आणि इमाद वसीम हे दोघेही टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसतील.

सध्या पाकिस्तानचा संघ आयर्लंडविरुद्ध खेळतोय. त्या मालिकेसाठी पाकिस्तानने 18 सदस्यीय संघ निवडला असून त्यातीलच 15 खेळाडूंना टी-20 वर्ल्ड कपसाठी निश्चित केल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांकडून समोर आली आहे.  पाकिस्तान क्रिकेट मंडळाने टी-20 वर्ल्ड कप संघाच्या निवडीबाबत द्विधा मनःस्थितीत असल्यामुळे त्यांनी आयसीसीकडून काहीवेळ मागितला होता. त्यांनी आता आयसीसीकडे अधिपृत संघ जाहीर केला आहे. तो संघ येत्या दोन-तीन दिवसांत प्रत्यक्षात जाहीर केला जाईल. पाकिस्तानने आपल्या संघात चार अष्टपैलूंची निवड केली असल्याचेही यादीवरून निश्चित झालेय.

  • पाकिस्तानचा संभाव्य संघ ः बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, मोहम्मद रिझवान, उस्मान खान, आझम खान, अबरार अहमद, इमाद वसीम, शाहीन शाह आफ्रिदी, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद आमीर, नसीम शाह, अब्बास आफ्रिदी, सईम अयुब, हारिस रऊफ.
  • राखीव खेळाडू ः सलमान अली आगा, हसन अली, इरफान खान

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;