मी आता सुटलेला वळू झालोय, कुणाबरोबरही लढू शकतो; माजी अध्यक्ष बृजभूषण सिंग यांची मतदारांना आश्वासने
पुस्तीत लैंगिक आरोपांमुळे बृजभूषण शरण सिंह यांना खासदारकीचे तिकीट गमवावे लागले आहे. त्यांच्यावर आरोप निश्चित झाले आहेत. असे असले तरी ते दुपटीने काम करत आहेत. प्रचार करत आहेत. मी तर आता एक सुटलेला बैल आहे. मी तुमच्यासाठी पुणाबरोबरही लढू शकता. मी ना मी म्हातारा झालोय, ना मी निवृत्त झालोय. मी आता पहिल्यापेक्षा दुपटीने तुमची कामे करीन असे वचन देतो, अशी आश्वासने पुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे माजी खासदार बृजभूषण सिंग यांनी आपल्या मुलाच्या प्रचार सभेत दिली आहेत.
मी जेव्हा मिझोरम, नागालॅण्ड, बिहार, बंगाल येथील पुस्तीपटूंच्या हितासाठी काम करायला सुरुवात केली तेव्हा ती गोष्ट काहींच्या डोळय़ात खुपत होती. दुर्गम प्रांतातील पुस्तीपटूंच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय मी घेतला होता. त्यांना संरक्षण देण्यास सुरुवात केली होती, मात्र त्याच दिवसापासून काही लोक माझे विरोधक झाले. या सर्वांना माझ्याकडून महिन्याला दीड लाख रुपये मिळत होते, मात्र मी केलेले सर्व उपकार वाया गेले, अशी खंत बृजभूषण सिंह यांनी व्यक्त केली.
पुस्तीत झालेल्या लैंगिक आरोपामुळे बृजभूषण सिंह यांचे तिकीट कापले गेले आहे. मात्र त्यांना तिकीट मिळाले नसले तरी त्यांच्याजागी त्यांच्या मुलाला केसरगंज येथून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. आता मुलाच्या प्रचाराची धुरा ते स्वतःच वाहात आहेत. मुलाच्या प्रचारार्थ कर्नलगंज येथे झालेल्या एका सभेमध्ये त्यांनी यांनी आपण केलेले उपकार वाया गेल्याची भावना बोलून दाखवली होती. बृजभूषण म्हणाले, ‘मी दुर्बलांना साथ दिली म्हणून आज ते माझा विरोध करत आहेत. पाच वर्षांपूर्वी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नरसिंग यादव जिंपून परत आला तेव्हा हे लोक म्हणाले, आमच्या चाचण्या, ट्रायल घेण्याची परंपरा नाही, आम्ही ट्रायल घेणार नाही, तेथून माझा विरोध सुरू झाला. कारण नरसिंग हा मुंबईचा रहिवासी असून तो अत्यंत गरीब पुटुंबातील होता. या लोकांना त्याचा हक्क मारायचा होता. या लोकांनी फसवणूक करून त्याच्या जेवणात अमली पदार्थ मिसळले, जेणेकरून तो अपात्र होईल.’
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List