अयोध्या पोळ यांच्यावर मिंधेंच्या गुंडांचा भ्याड हल्ला
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या मिंधे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षाच्या अयोध्या पोळ यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केल्याची आणि विनयभंग केल्याची घटना आज घडली. याप्रकरणी यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांविरोधात नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे पोळ यांनी सांगितले. दरम्यान, माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला यामिनी आणि यशवंत जाधव जबाबदार असतील, असे पोळ यांनी म्हटले आहे.
यामिनी जाधव यांच्या काही कार्यकर्त्यांनी दार ठोठावले. मी बेडरूममध्ये होते. कामवाल्या ताईंनी दरवाजा उघडला. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. याबाबत जाब विचारला असता महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली, ओरबाडले, तर पुरुष कार्यकर्त्यांनी माझा विनयभंग केला असा गंभीर आरोप अयोध्या पोळ यांनी केला आहे. या घटनेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता हातातील मोबाइल हिसकावून घेतला आणि मारहाण केली असा आरोपही त्यांनी केला आहे. ज्या पुरुषांनी विनयभंग केला आणि महिलांनी मारहाण केली त्या सर्वांना अटक करण्याची मागणी पोळ यांनी केली आहे. पोळ यांनी बीकेसीवरील महाविकास आघाडीच्या सभेला जाण्यापूर्वी फेसबुक लाइव्ह करून घडल्या प्रकाराबाबतची माहिती दिली. त्याचबरोबर मुंबई पोलिसांनाही टॅग करण्यात आल्याचे पोळ यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List