मालिवाल यांना मारहाण; बिभव कुमार यांच्यावर गुन्हा दाखल
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सोमवारी केजरीवाल यांचे सहायक बिभव कुमार यांनी आपल्याला लाथा मारल्या आणि सात-आठ वेळा थपडाही लगावल्या, असा आरोप आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे. मालिवाल यांच्या जबाबानुसार गुरुवारी रात्री पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून त्यात आरोपी म्हणून बिभव कुमार यांचे नाव देण्यात आले आहे. तर, मालिवाल यांना पुढे करून केजरीवाल यांना अडकवण्याचा हा भाजपचा कट असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.
मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाणप्रकरणी दाखल झालेल्या या एफआयआरमध्ये, बिभव कुमार त्यांना पूर्ण ताकदीने वारंवार मारत असताना त्या मदतीसाठी ओरडत होत्या पण, पुणीही त्यांच्या बचावासाठी आले नाही, असा दावा त्यांनी केला आहे. आज तीस हजारी कोर्टात न्यायदंडाधिकाऱयांसमोर मालिवाल यांनी याच प्रकरणी आपले निवेदनही नोंदवले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List