मोदींसाठी हायवे बंद केला, मुंबईकरांचे पुन्हा हाल

मोदींसाठी हायवे बंद केला, मुंबईकरांचे पुन्हा हाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी शुक्रवारी सायंकाळी अंधेरी पश्चिम द्रुतगती महामार्गावर शहराच्या दिशेने जाणारी वाहतूक अर्धा तास रोखली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले.

महायुतीच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी सायंकाळी मुंबईत आगमन झाले, मात्र मोदींच्या ताफ्यात कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी अर्धा तास आधीच अंधेरी पश्चिम द्रुतगती महामार्गावर शहराच्या दिशेने जाणारी वाहतूक रोखली. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. शेवटी वैतागलेल्या वाहनचालकांनी आरडाओरड सुरू करताच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.  बुधवारी पार पडलेल्या मोदींच्या घाटकोपर येथील रोड शोमुळेदेखील मुंबईकरांचे हाल झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;