होर्डिंग दुर्घटना अत्यंत गंभीर; हे मानवतेविरोधातील कृत्य
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला कनिष्ठ न्यायालयाने 26 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. भिंडेला होर्डिंग लावण्यासाठी परवानग्या कोणी दिल्या? बेकायदा होर्डिंगसाठी पैसे कोणी गुंतवले? याचा सखोल तपास करणार असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर ही दुर्घटना अत्यंत गंभीर आहे. निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. हे मानवतेविरोधातील कृत्य आहे, असे महत्त्वपूर्ण मत न्यायालयाने नोंदवले.
त्याला शुक्रवारी किल्ला कोर्टात अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी के. एस. झांवर यांच्यापुढे हजर केले होते. पोलिसांनी भिंडेला 14 दिवसांची कोठडी सुनावण्याची विनंती केली, तर अॅड. रिझवान मर्चंट यांनी भिंडेची बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने भिंडेची 26 मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. या घटनेत निष्पाप लोकांचे बळी गेले ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
बेकायदा होर्डिंग लावणाऱयांचे रॅकेट
बेकायदा होर्डिंग लावण्याच्या रॅकेटमध्ये भिंडेसह अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. संबंधितांनी केवळ एक नव्हे, तर अनेक होर्डिंग्ज उभी केली आहेत. अशा होर्डिंगसाठी परवानग्या कोणी व कशा दिल्या? एक होर्डिंग उभे करण्यासाठी 5 ते 6 कोटी रुपये खर्च येतो. हा पैसा कोणी गुंतवला? याचा अधिक तपास करायचा आहे, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.
न्यायालय म्हणाले..
n हे मानवतेविरोधातील पृत्य आहे. या गुह्याचे स्वरूप गंभीर असून आरोपीला पोलीस कोठडीत पाठवणे अत्यंत आवश्यक आहे. n पोलिसांनी सादर केलेला रिमांड अर्ज फेटाळल्यास या गंभीर गुह्याच्या तपासात बाधा येईल. n 16 निष्पाप लोकांचा बळी घेणाऱया होर्डिंग दुर्घटनेला जर आरोपी भिंडे जबाबदार नसेल तर तो घटना घडल्यानंतर मुंबईतून पळून का गेला?
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List