अंधेरीतील जलवाहिन्या दुरुस्तीचे काम रद्द; 22 मे रोजी पाणीपुरवठा सुरळीत
के पूर्व विभागातील मुख्य जलवाहिन्या जोडणी व दुरुस्तीचे काम तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे 22 मे रोजी के पूर्व, के पश्चिम व पी दक्षिण विभागातील पाणीपुरवठा दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत सुरू राहील, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी 22 मे रोजी पाणीपुरवठा बंद करण्यात येईल असे पालिकेने आधी म्हटले होते.
पालिकेतर्फे के पूर्व विभागात अंधेरी (पूर्व) येथील ‘बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रेसिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेसिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन येथे प्रत्येकी 1500 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि नवीन 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी काढून टाकण्याचे काम बुधवार, 22 मे रोजी सकाळी 9 वाजेपासून गुरुवार, 23 मे रोजी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार होते, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे हे काम रद्द करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List