हायकोर्टासाठी तातडीने जागा द्या, डिसेंबरची वाट पाहू नका! मिंधे सरकारला सुप्रीम कोर्टाचा दट्टय़ा

हायकोर्टासाठी तातडीने जागा द्या, डिसेंबरची वाट पाहू नका! मिंधे सरकारला सुप्रीम कोर्टाचा दट्टय़ा

मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीसाठी जागा देण्यास टाळाटाळ करणाऱया मिंधे सरकारला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच दट्टय़ा दिला. वांद्रे येथील नियोजित जागा तातडीने उपलब्ध करून द्या, पहिल्या टप्प्यातील भूखंड वितरण सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा, डिसेंबरची वाट पाहू नका, असा सक्त आदेश न्यायालयाने मिंधेंना दिला.

वांद्रेतील जागा सहा महिन्यांत उपलब्ध करून देणार असल्याची हमी मिंधे सरकारने दिली होती; मात्र प्रत्यक्षात वेळकाढूपणा केला. मिंधे सरकारच्या उदासीनतेवर उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आणि वांद्रेतील जागेला पर्याय म्हणून गोरेगाव येथील जागेचा विचार करण्याची सूचना केली. त्या पार्श्वभूमीवर बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठक्कर व इतरांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिले. त्याची स्युमोटो गंभीर दखल घेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला यांच्या खंडपीठाने शुक्रवारी मिंधे सरकारला अल्टिमेटमच दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यासाठी सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील भूखंड वितरण पूर्ण करा, इमारत प्रकल्पासाठी निश्चित केलेला संपूर्ण 9.64 एकरचा भूखंड सोपवण्यासाठी डिसेंबरपर्यंतची वाट पाहू नका, अशी ताकीद न्यायालयाने मिंधे सरकारला दिली. याचवेळी भूखंड वितरणाच्या प्रक्रियेत प्रगतीची अपेक्षा व्यक्त करीत न्यायालयाने पुढील सुनावणी 15 जुलैला निश्चित केली.

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी समर्पित लवाद केंद्राची गरज व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी शुक्रवारी बाजू मांडली. एअर इंडियाच्या इमारतीतील काही मजले रिकामे असून त्यांचा वापर केला जाऊ शकतो. त्याव्यतिरिक्त वांद्रे-पुर्ला का@म्प्लेक्समध्ये काही जागा असल्याचे मेहता यांनी सांगितले.

सरकारने नवीन इमारतीचे बांधकाम मार्गी लावण्यासाठी रिकाम्या इमारती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवाव्यात. यापुढे पुठलाही विलंब न करता बांधकाम सुरू करावे, तसेच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी आर्किटेक्ट निवड प्रक्रियेला गती द्यावी, अशी सूचना सरन्यायाधीशांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;