आरटीई प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी 17 हजारांहून अधिक अर्ज
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी 9 हजार 139 शाळांमध्ये एपूण 1 लाख 2 हजार 436 जागा उपलब्ध असून या जागांसाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 17 हजार 777 fिवद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज आले. मुंबई विभागातून आतापर्यंत 5 हजार 670 जागांसाठी केवळ 433 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी 31 मेपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यापूर्वी राबविण्यात आलेल्या आरटीई प्रवेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने शिक्षण विभागाने नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे पालकांना पुन्हा नव्याने अर्ज नोंदणी करावी लागणार आहे. पालकांनी पुन्हा नव्याने नोंदणी करण्यास विसरू नये, अन्यथा विद्यार्थ्याला शाळा प्रवेशापासून वंचित रहावे लागेल, अशी सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List