नगरमध्ये कालव्यात कुजलेल्या अवस्थेत सापडले मृतदेहाचे तुकडे; परिसरात भीतीचे वातवरण

नगरमध्ये कालव्यात कुजलेल्या अवस्थेत सापडले मृतदेहाचे तुकडे; परिसरात भीतीचे वातवरण

नगर जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेवासा तालुक्यात पाण्यामध्ये सडलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबल उडाली आहे.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथून पाथर्डीकडे जाणाऱ्या पाण्याच्या पाटामध्ये सडलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबल उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डीकडे जाणाऱ्या पाण्याच्या पाटामध्ये प्रथम एक मानवी पायाचा मांसाचा तुकडा पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पाटाच्या पूर्व दिशेला कुजलेल्या अवस्थेत मानवी पायाचा तुटलेला मांसाचा भाग आढळून आला. तिथून पुढे काही अंतरावर पिवळ्या रंगाच्या गोणीमध्ये पुरुषाचे मुंडके आणि धडाचा कुजलेला मांसाचा तुकडा सापडला. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे खुनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

सदर घटनेबाबात बालाजी देडगावचे पोलीस पाटील प्रल्हाद यशवंत ससाने यांनी नेवासा पोलीस स्थानकात फिर्याद दिली. सदर घटनेबाबात काही माहिती असल्यास नेवासा पोलिसांशी संपर्क साधावा. त्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;