शाहरुख आणि करण जोहर ‘समलैंगिक संबंध’ ठेवायचे; गायिका सुचित्राचा खळबळजनक दावा
सुचित्रा रामादुरई ही दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रसिद्ध रेडिओ जॉकी, लोकप्रिय पार्श्व गायिका, गीतकार, संगीतकार आहे. सुचित्रा अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे वादात आली आहे. सुचित्राने यापूर्वीही अनेकदा इंडस्ट्रीतील कलाकारांबद्दल खळबळजनक दावे केले आहेत. आता अलीकडेच तिने आपल्या पूर्वाश्रमीचा पती कार्तिकसह बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि करण जोहरबद्दल मोठा दावा केला आहे. सुचित्राने तिचा पती कार्तिक कुमार, बॉलीवूडचा किंग खान आणि करण जोहर यांना ‘गे’ म्हटले आहे.
“My Ex husband, SRK and Karan Johar had gay encounter in London. SRK and Karan Usually go to the countries on holiday where gay encounters are legel” – Tamil singer Suchitra pic.twitter.com/SkPp8SCdWm
— MASS (@Freak4Salman) May 16, 2024
गायिका सुचित्राने तामिळ मीडिया कुमुदमला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर आणि सुपरस्टार शाहरुख खानबद्दल काही धक्कादायक दावे केले आहेत. सुचित्राने शाहरुख खान आणि करण जोहर यांच्यात समलैंगिक संबंध असल्याचा दावा केला. याचबरोबर पूर्वाश्रमीचा पती कार्तिक कुमारही ‘गे’ असल्याचा दावा सुचित्राने केला आहे. तसेच लंडनमध्ये शाहरुख आणि करणसोबत कार्तिकचे संबंध होते. बॉलिवूडचे अनेक कलाकार अशा देशांमध्ये सतत प्रवास करतात जिथे समलैंगिक संबंधांना मान्यता आहे, असेही सुचित्राने म्हटले.
सुचित्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एकदा माझा पूर्वाश्रमीचा नवरा कार्तिक लंडनला फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याची ओळख करण जोहर आणि शाहरुख सोबत झाली. त्यानंतर ते लंडनमधील एका बारच्या गल्लीत फिरत होते. ते सगळे क्रॉस्ड ड्रेस होते. करण आणि शाहरुख बऱ्याचदा परदेशात गेल्यावर असे वावरतात. ते असे कपडे घालून गे एरियात जातात आणि तिकडच्या परिसरात मिसळतात आणि रात्रीचा आनंद घेतात.
कार्तिकने दिलं स्पष्टीकरण…
सुचित्राच्या या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तिचा पूर्वाश्रमीचा नवरा कार्तिकने या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलंय. ‘मी समलैंगिक असेन तर मी ते आनंदाने स्वीकारेन. मला सगळ्या प्रकारच्या लैंगिक संबंधांचा अभिमान आहे. यात शरमेची गोष्ट काहीच नाहीये’, कार्तिकने म्हटले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List