Ghatkopar hoarding collapse – अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा होर्डिंगखाली दबून मृत्यू

Ghatkopar hoarding collapse – अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा होर्डिंगखाली दबून मृत्यू

घाटकोपर छेडानगर येथे महाकाय बेकायदा होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेबाबत नवीन अपडेट समोर आले आहेत. बुधवारी घटनास्थळावरून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातात मृत्युमुखी पडलेले हे दोघे कार्तिक आर्यनचे मामा-मामी असल्याचे समोर आले. आतापर्यंत या दुर्घटनेत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे, 74लोकं जखमी झाली आहेत. या अपघातातील मृतां कार्तिक आर्यनच्या मामा-मामींचा समावेश होता.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कार्तिक आर्यन याचे कुटुंब सध्या दुख:त आहे. होर्डिंग पडून ज्या 16 लोकांचे दुर्देवी मृत्यू झाले त्यात कार्तिक आर्यनचे मामा-मामीही होते. बुधवारी त्या दोघांचे मृतदेह सापडले. मृतदेहाची ओळख पटवत असताना कळले की, एअर ट्राफिक कंट्रोलचे जनरल मॅनेजर मनोज चनसोरिया (60) आणि त्यांची पत्नी अनीता (59) आहेत. दोघं बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन आचे मामा मामी आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवुसार, चनसोरिया दाम्पत्य सोमवारी मुंबईहून जबलपूरला जात होते. तेव्हापासून त्यांचा शोध घेतला जात होता,मनोज चनसोरिया यांचा मोबाईल स्वीचऑफ येत होता. फोन ट्रेस केला असता त्यांचे लोकेशन घाटकोपर पेट्रोलपंपजवळ दाखवत होते. ई टाईम्सने जेव्हा कार्तिक आर्यनकडे याबाबत प्रतिक्रिया मागितली त्यावेळी त्याने नकार दिला. कार्तिक अंत्यसंस्कारासाठी जाणार आहे.

ही घटना 13 मे रोजी घडली आहे. पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळले. या वेळी पाऊस आणि वादळापासून बचाव करण्यासाठी पेट्रोल पंपावर उभे असलेले 100 जण या होर्डिंगखाली दबले गेले. तपास हे होर्डिंग बेकायदेशीर असून 15 हजार चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्याचे वजन 250 टनांपेक्षा जास्त झाले असते. नुकटेक पोलिसांनी मुख्य आरोपी भावेश भिंडे आणि इतरांना राजस्थानमधून अटक केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;