गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने फोडले तीन कॅफे

गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने फोडले तीन कॅफे

सांगलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील व्हिडीओ बनवले. त्यानंतर ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकारामुळे कॅफेत गैरप्रकार होत असल्याचे समोर आले. यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे.

सांगलीतील कॅफे ‘हँग ऑन’ येथे ही घटना घडली आहे. शंभर फुटी रस्त्यावरील कॅफे ‘हँग ऑन’मध्ये पीडित अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील व्हिडीओ बनवले. त्यानंतर ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले. या घटनेने सांगलीत एकच खळबळ उडाली. आता या घटनेचे पडसाद उमटले आहे. या घटनेनंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी शुक्रवारी तीन कॅफेंची तोडफोड केली.

या घटनेबाबत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे पदाधिकारी दिगंबर साळुंखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही अनधिकृत कॅफे बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे करत आहोत. कॅफेमध्ये गैरप्रकार होत असल्याचे प्रकार लक्षात घेऊन मागणी केली होती. सहा महिन्यांपूर्वी अशीच घटना समोर आली होती. एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीचे शोषण केले आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्या मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आला. सहा महिन्यांपासून आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे. तक्रार केली तरी संबंधित कॅफे चालकाने जे करायचे ते सुरुच ठेवले होते. सहा महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. आता यापुढे आम्ही शांत बसणार नाही. आता अशा पद्धतीचे कॅफे जिथे सुरू असतील ते फोडून बंद करण्यात येईल, असा इशाराच शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेच्या दिगंबर साळुंखे यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;