Bhandara crime news – प्लॉटच्या वादातून भाच्याचा मामावर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल
प्लॉटच्या वादातून भाच्याने मामावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखना तालुक्यातील रेंगेपार/कोठा येथे घडली आहे. भाच्याच्या हल्ल्यात मामा ताराचंद बिसन पंधरे (वय – 69) हे जखमी झाले असून त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन शिवचरण मडकाम (वय- 24) याच्याविरुद्ध लाखनी पोलीस ठाण्यात कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराचंद हे आरोपी सचिनचे मामा आहेत. वडिलोपार्जित असणारा प्लॉट आईच्या नावावर करून देण्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. याच वादातून आरोपीने ताराचंद यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादिच्या तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालावरून लाखनी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील सोनावने पुढील तपास करीत आहेत.ो
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List