बारामतीनंतर शिरूरमध्ये EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे CCTV बंद; रोहित पवारांचा अजित पवार गटाकडे इशारा

बारामतीनंतर शिरूरमध्ये EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे CCTV बंद; रोहित पवारांचा अजित पवार गटाकडे इशारा

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघातील ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. या सर्व ईव्हीएमवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे, मात्र या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही 24 तास बंद ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत अजित पवार गटाकडे सूचक इशारा केला आहे.

बारामतीनंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही 24 तास बंद ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्याला एकही जागा जिंकता येणार नाही हे लक्षात आल्यानेच एका गटाकडून तर हे केले जात नाही ना? असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी अजित पवार गटाकडे इशारा केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. प्रशासनाने स्ट्रॉंग रूमची सुरक्षा वाढवून गेल्या 24 तासात सीसीटीव्ही का बंद ठेवण्यात आले याची चौकशी करावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी ट्विटद्वारे केली आहे.

दरम्यान, ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही डिस्प्ले 24 तास बंद होते. हा सगळा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सीसीटीव्ही डिस्प्ले सुरू केले अशी माहिती माध्यमांनी दिली आहे. मात्र या प्रकारामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली हे नक्की.

बारामतीत काय घडलेले?

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बारामती मतदारसंघात मतदान पार पडले. या मतदारसंघातील सर्व ईव्हीएम कोरेगाव पार्क येथील फूड कॉर्पोरेशनच्या गोदामाच्या ठिकाणी स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. या सर्व ईव्हीएमवर सीसीटीव्ही पॅमेऱयांच्या माध्यमातून निगराणी ठेवली जात आहे, मात्र सोमवारी सकाळी या स्ट्राँग रूमच्या बाहेर असलेल्या मॉनिटरवर दिसणारे सीसीटीव्ही फुटेज अचानक बंद झाल्याची घटना घडली. त्यामुळे स्ट्राँग रूमबाहेर पाहरा देणाऱ्या कार्यकर्त्यांत एकच खळबळ उडाली. सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत झाल्या प्रकाराला वाचा फोडली. तसेच यासंदर्भात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली. यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱयांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत सुरू केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;