प्रशासनाची मोठी कारवाई ! चंद्रपूरमध्ये 80 लाख रुपयांची चोर बीटी बियाणे जप्त

प्रशासनाची मोठी कारवाई ! चंद्रपूरमध्ये 80 लाख रुपयांची चोर बीटी बियाणे जप्त

चंद्रपूर जिल्हा परिषद कृषी विभागाने मोठी कारवाई करीत तब्बल 80 लाख रुपयांचे चोर बीटी बियाणे जप्त केले आहे. जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील भिमनी गावातील शेतातील घरात भरारी पथकाने अनधिकृत बियाणांचा साठा हस्तगत केला. प्रशासनाच्या या कारवाईने चोर बीटी तस्करात एकच खळबळ माजली आहे. ही सर्वात मोठी कारवाई मानली आहे.

आरोपी नीलकंठ गिरसावळे यांच्या शेतातील घरात 39.88 क्विंटल संशयास्पद चोर बीटीचा मोठा साठा मिळाला. 76 लाख रुपयाचे हे बियाणे असून प्रशासनाने हा माल ताब्यात घेतला आहे. अनधिकृत संशयित कापूस बियाण्याचा साठा इतरत्र परिसरात कुठेही विक्री केली आहे काय याचा तपास कृषी विभाग व पोलीस विभाग करीत आहेत. शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. याची तयारी म्हणून चोरबीटी तस्कराचे मोठे जाळे जिल्ह्यात सर्वत्र पसरले आहेत. अशात प्रशासनाने केलेल्या या मोठ्या कारवाईने तस्करात चांगलीच खळबळ माजली आहे. अनधिकृत चोर बिटी कापूस बियाण्यास शासनाची परवानगी नाही. कृषी विभाग ने अनधिकृत बियाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकाची नेमणूक केली आहे. आपल्या परिसर संशयास्पद अनधिकृत बियाणे साठवणूक व विक्री होत असेल तर त्याची माहिती कृषी विभागला देण्याच आवाहन करण्यात आल आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;