असेही आई-बाप! 3 वर्षांच्या मुलीला कारमध्येच विसरले
मुलीचे आई–बाबा लग्नसमारंभात रमून गेले. पाहुण्यांशी गप्पा मारण्यात इतके गर्क झाले की, त्यांना आपल्या बाळाची जराही आठवण आली नाही. तब्बल दोन तासांनंतर त्यांना मुलीची आठवण आली. त्यांनी एकमेकांकडे गोरविका कुठेय म्हणून विचारणा केली. मग त्यांच्या लक्षात आले की, ते तिला कारमध्येच विसरले.
आई–वडिलांच्या निष्काळजीपणामुळे तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली. मुलीला कारमधून विसरून आई-वडील लग्न सोहळय़ात गेले. बराच वेळ त्यांना मुलीची आठवण नव्हती. मुलगी जेव्हा सापडली तेव्हा तिचा मृत्यू झाला होता. ही घटना बुधवारी राजस्थानमधील कोटा येथे घडली.
खतोली पोलीस स्टेशनचे एसएचओ बन्ना लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप नगर हे पत्नी आणि दोन मुलींसह एका लग्नाला गेले होते. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर आई आणि मोठी मुलगी कारमधून बाहेर पडली आणि तीन वर्षांची गोरविका तिच्या वडिलांसोबत कारमध्येच राहिली. धाकटी मुलगी कुठेय असे विचारल्यावर शोधाशोध झाली. ती कारमध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि मग त्यांनी एकच धावपळ केली. मात्र तोवर सर्व संपले होते. पालकांनी बाळाला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List